[मोताळा लाईव्ह ] गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून यातील काही मासे शिवसेनेच्या गडाला लागले आहेत काही दिवसापासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग पाहायला मिळत आहे उद्या दिनांक 22/०३/20 २५ रोजी दुपारी २ वाजता संत गजानन महाराज संस्थान थड येथे भव्य असा काँग्रेसच्या पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होत असून या प्रवेशासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड व मोताळा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार असून या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये हजारो कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश घेणार आहे मोताळा तालुक्यातील असलेले काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी शिवसेनेत जाहीर प्रवेश होतं असून काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे यालाच कंटाळून आता हे शिवसेनेत प्रवेश करत आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे