ते दोघे मागून मोटर सायकलवर आले महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची पोत हिसकावुन घेतली. अन फरार झाले ,मोताळा शहरातील घटना

754

[मोताळा लाईव्ह ] मोताळा ते नांदुरा रस्त्यावरती सर्वेश्वर नगरच्या पाटीजवळ, आज दिनांक 25 मार्च 2025
12 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर सुरेश सिंग सोळंकी व त्याची पत्नी रा. टाकरखेड, ता.नांदुरा, हे मोताळा येथून डिस्कव्हर मोटार सायकल क्र एम एच 19 बी एच 0863 आपल्या घरी म्हणजे टाकरखेड येथे जात असताना मागून एका मोटरसायकल वरती दोन भामटे चोर आले त्या भामट्यांनी इन्टेक्स कंपनीचा मोबाईल किनंती 10,000/- रु व ज्ञानेश्वर सुरेश सिंग सोळंकी यांच्या पत्नीच्या गळ्यातील एका तोळ्याची सोन्याची मणी मंगळसुत्र पोत किमती अंदाजे 40000 रु असा एकुण 50,000/- रु चा माल जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेला आहे .यामध्ये ज्ञानेश्वर सुरेश सिंग सोळंकी हे जखमी झाले असून त्याच्या डाव्या पायाला मुका मार लागला आहे. येथून चोरयांनी पळ काढला असून त्याबाबत बोराखेळी पोलीस स्टेशन येथे अ.प नंबर 136/2025 कलम 309 (4) BNS नुसार दोन अनोळखी इसमांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहे या घटनेमुळे मोताळा शहरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या पुढे आता या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे..