[मोताळा लाईव्ह] मोताळा तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा माजी प.स सभापती याची गट विकास अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार केली असून तरोडा येथील ग्रामपंचायतचे सचिव व सरपंच यांनी १५ वा वित्त आयोगामधील रक्कमेचा अपहार केला असून नालीचे बांधकाम न करता ९४,०००/- रुपयांचे बिल काढले आहेत हे बिले जि.एस.टी कपात न करता काढले असून .तसेच १५ वा वित्त आयोगाचे कामे ग्रा.पं. सदस्यांना विश्वासात न घेता व आराखडा नुसार कामे न करता बिले काढली असून .याबाबत सर्व कामाची सखोल चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी. तसेच यापुढे आराखडयानुसार होत नसलेल्या कामाची बिले देण्यात येऊ नये. अशा प्रकारची लेखी तक्रार मोताळा पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश गण्यानसिंग बस्सी यांनी केली आहे