[मोताळा लाइव्ह] राज्यस्तरीय समितीव्दारे तालखेड ग्रामपंचायतीचे मुंल्याकन अटल भूजल योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षा मध्ये उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविनाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायत यांना पुरस्काराने सन्मानित करणेकरीता भूजल समृध्द ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालखेड ग्रामपंचायतीने या स्पर्धेमध्ये उस्पूर्त सहभाग घेतला असून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याकरीता नियोजनाप्रमाणे दिनांक 08.05.2025 रोजी ग्रामपंचायत तालखेड येथे राज्यस्तरीय समितीने राज्यपातळीवरील मूल्यांकन केले, त्या समितीमध्ये श्री. रिशिराज गोसकी -वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा नोडल अधिकारी अटल भूजल योजना महाराष्ट्र, आयुक्तालय पुणे. डॉ प्रमोद रेड्डी -प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे. श्री सुभाष घाडगे:-कृषी तज्ञ,राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष,पुणे.
श्री. नितिन तट्टे वरिष्ठ भूवैज्ञानिक बुलढाणा सर्व समिती सदस्य व अध्यक्ष यांच्या परवानगीने मूल्यांकनास सूरवात केली.
भूजल समृध्द ग्राम स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतीचे मुल्यांकन खालील निकषाच्या आधारे करण्यात आले. 1. प्राथमिक तयारी-लोकसहभाग व जनजागृती करणे आणि गावशिवारातील भूजलाबाबतची माहीती संकलीत करणे.
2. लोकसहभागातुन ताळेबंद, जलसुरक्षा आराखडा व पिक नियोजन तयार करणे. 3. जलसुरक्षा आराखडयामध्ये समाविष्ठ योजना अभिसरणाचे माध्यमातुन राबविणे.
4. पाणी बचतीच्या उपाययोजना राबविणे.
5.नाविण्यपूर्ण उपक्रम.
6.पाऊस पाणी मोजमाप व भूजलपातळी विषयक निरीक्षणे. 7. फलनिष्पती
8. पारदर्शकता व जाहीर प्रगटन इत्यादी प्रमुख टप्यांच्या आधारे राज्यस्तरीय समितीव्दारे मुंल्याकन करण्यात आले.
त्यानंतर भूजल माहीती केंद्र, परसबाग, लोकसहभागातुन नाल्यातील गाळ काढणे, शौच खडडे, मुरघास युनिट, कॅच द रेन, बंदिस्त पाईपलाईन, गटशेती, सांडपाणी व्यवस्थापनाकरीता सार्वजनिक शौच खड्डे इत्यादी विषयांवर सावित्तर चर्चा केली केली.
मुंल्याकना दरम्यान श्री. काळे साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी, प. स. मोताळा, श्री. किशोर साळोख माहिती शिक्षण व संवाद तज्ञ , श्री. रामदास पंडित (DPMU) तसेच DIP मधील माहिती शिक्षण व संवाद तज्ञ शिवशंकर गव्हाळे, समुह संघटक शिवाजी मानकर,लोकनियुक्त सरपंच श्री. मारोती दिनकर कोल्हे, ग्राम विकास अधिकारी शिंदे साहेब, श्री. पडोळ साहेब, तसेच उपसरपंच, तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी, भूजल मित्र, ग्रामस्थ महीला/पुरूष इत्यादी मोठया संख्येने उपस्थित होते.