मोटरसायकल वरील दोन भामट्यांनी.. महिलेच्या हातातली पर्स हिसकली.. मोताळा ते मलकापूर रोड वरील घटना ..

73

[ मोताळा लाईव्ह ]  दि. 17/05/2025 रोजी दुपारी १. ३० वाजेच्या सुमारास सौ.संगिता सुनिल वराडे, व पती सह बजाज प्लाटीना क्र एम.एच 19 डब्लु. ओ. 0330 या गाडीने मोताळा येथे त्याच्या माहेरी येत असताना मलकापुर वरून मोताळा येथे येत असताना त्याच्या मोटर सायकल चा दोन अनोळखी इसम हिरो कंपनिचे एम.एच 28 सि.ए. 5469 या एक्ट्रीम गाडीने त्यांचा पाठलाग करत होते हि बाब आम्हाला समजलया नंतर आम्ही आमच्या मोटारसायकलचा स्पीड वाढवला असता पाठलाग करत असल्लया त्यानी सुद्धा आपल्या मोटारसायकलचा स्पीड वाढवुन त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला व शेलापुर गावाचे अंदाजे 1 कि.मी आधी त्यानी मोटार सायकल आमच्या मोटारसायकलच्या जवळ आणून मागे बसलेल्या अनोळखी इसमाने माझ्या हातात असलेली माझी पर्स ज्यामध्ये 7000 रु रोख रक्कम होती ती बळजबरीने हिसकावुन घेतली तेथून मोताळया कडे पळ काढला ,संगिता सुनिल वराडे, व त्याचे पती शेलापुर गावात पोहचलो व तेथील दुकानदार यांना सदर घटना सांगुन वरील इसमां बाबत विचारणा केली असता त्यांनी माहीती दिली कि, सदरचे इसम हे त्यांचे मोटारसायकलने तळणी गावाकडे गेले आहे व त्यांनी तळणी गावात कोणालातरी फोन करुन सदरची घटना सांगीतली व सदर इसम दिसले तर त्यांना पकडण्या बाबत सांगीतले आम्ही पती पत्नी तळणी गावाचे दिशेने त्यांचा पाठलाग करत जात असतांना ते दोनही इसम समोरुन त्यांचे मोटार सायकलने भरधाव वेगाने आले व त्यावर मागे बसलेल्या इसमाने आमच्या मोटारसायकलला जोराची लाथ मारल्याने मी व माझे पती आम्ही खाली पडलो.त्यानंतर त्या दोन इसमांनी त्या ठिकाणाहून पळ काढला
मोटार सायकला लाथ मारल्याने खाली पडल्याने संगिता सुनिल वराडे, यांच्या नाकाला व तोंडाला दुखापत झाली असून मात्र शेलापुर गावाकडे आल्यावर शेलापुर येथील नागरीकाकानी यांना पकडून ठेवले होते हे याबाबत सौ.संगिता सुनिल वराडे, बोराखेळी पोलीस स्टेशन तक्रार दिली असून हे दोन्ही आरोपी मलकापूर येथील असून त्यामध्ये प्रमोद नंदलाल खुर्दे, वय 22 वर्ष, रा. रोहीदासनगर, मलकापुर ,यश भगवान दांडगे, वय 18 वर्ष, रा. दिपक नगर गल्ली नं 2 मलकापुर, असून त्यांना बोराखेळी पोलिसांनी अटक केली असून विविध कलमानुसार गुन्हा दाखल करणयात आले आहे पुढील तपास बोराखेळी पोलीस करता आहे…..