[मोताळा लाईव्ह] मोताळा तालुक्यातील तिग्रा येथील एका २४ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना
दिनांक 19 मे २०२५ च्या रोजी दुपारी उघडकीस आली.अविनाश रामेश्वर शेळके वय 24 वर्ष रा. तिघ्रा ता.मोताळा जि. बुलडाणा ह्याने नळगंगा धरणाच्या भिंती खाली पाटाजवळ असलेल्या निंबाचे झाडाला, भोरटेक शिवार येथे दोरीने गळफास घेतला असून मात्र आत्महत्या मागचे कारण मात्र समजू शकले नसून या प्रकरणाचा तपास बोराखेडी पोलीस करीत आहे.