प्रेमसंबध असल्याची खोटी बदनामी.. मुलीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

55

[मोताळा लाईव्ह ] प्रेमसंबंधाच्या खोट्या आरोपांनी बदनामी करत मानसिक छळ केला आणि जीवाने मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली.याबाबत बेबाबाई राजू सोळंके यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या प्रकरणी मोताळा तालुक्यातील परडा येथील तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार आणि प्रमिला हिरामण पवार (सर्व रा. परडा, ता. मोताळा) यांचा समावेश आहे.
वरील तिघांनी त्यांच्या मुलगा विश्वजीत याचे पीडित लता राजू सोळंके हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची खोटी बदनामी केली. तसेच तिला जीवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. या सातत्याच्या छळामुळे लता हिने विषारी औषध प्राशन केले त्यामध्ये तिचा मुत्यू झाला .बोराखेडी पोलीसस्टेशन मध्ये तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे