[मोताळा लाईव्ह] मोताळा नगरपंचायत हद्दीत काही महिन्यापासून मोताळा ते नांदुरा रोड वरती असलेल्या पावर स्टेशन जवळ सौर ऊर्जा प्रकल्प सुरू असून या प्रकल्प सुरू करण्यासाठी मोताळा नगरपंचायत यांची परवानगी घेणे आवश्यक होते.. मात्र या सौर ऊर्जा कंपनीने मोताळा नगरपंचायत ची ना हरकत घेतलेली आहे मात्र ती सुद्धा बनावट मोताळा नगरपंचायत च्या प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली की संबंधित सौर ऊर्जा प्रकल्प यांनी आपल्याकडून कुठल्याही प्रकारची एनओसी घेतली नाही त्यासाठी मोताळा नगरपंचायत प्रशासनाने या सौरऊर्जा प्रकल्प कंपनीला आपण मोताळा नगरपंचायत ची परवानगी घेतली आहे का याबाबत पत्रव्यवहार केला असता संबंधित कंपनीने मोताळा नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचे परवानगी असल्याचे पत्र मोताळा नगरपंचायत प्रश्न दिले त्यामुळे एकच खळबळ उडाली याबाबत मोताळा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी याबाबत बोराखेळी पोलीस स्टेशनला मोताळा नगरपंचायत प्रशासनात असलेला लिपिक याला प्राधिकुत करून बोराखडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात सांगितले त्यावरून आता बोरखडी पोलीस स्टेशन ही या सर्व प्रकरणावरती चौकशी करत असून मात्र बोराखेडी पोलिसांनी अद्यापही या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे मोताळा नगरपंचायत ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली असून मोताळा नगरपंचायत मध्ये नेमकं काय सुरू आहे हा सर्व सर्व मोताळावासीय नागरिकांना पडला आहे तर दुसरीकडे या प्रकल्पाला ही जी कोणी परवानगी दिली ती कोणी दिली व का दिली तशा प्रकारचा ठराव घेतला आहे का अशा अनेक बाबी उघड होणे गरजेचे आहे जर कोणी मोताळा नगरपंचायत चा कर बुडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी सर्वसामान्य नागरिकांच्या भावना असून याबाबत मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले आहे