इलेक्टिकल शॉक लागून १२ मेंढ्या ठार .. शेतकरयांचे लाखो रुपयाचे नुकशान

43

[ मोताळा लाईव्ह ] विजेचा शॉक लागून 12 मेंढरं ठार .. मोताळा तालुक्यातील राजुर येथील घटना
मोताळा तालुक्यातील राजुर येथील सुरेश लवंगे यांच्या बारा मेंढर ही इलेक्ट्रिक शॉक लागून मरण पावल्याचे वळके झाले असून दिनांक 25/05/2025  रोजी 1.30 वाजेच्या सुमारास गणेश लवंगे हे मेंढरं सराईसाठी गावाशेजारील असलेल्या या शेतामध्ये गेला असता त्या ठिकाणी जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरला संबंधित मेंढरं यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यामध्ये जागेवरती 12 मेंढरं ठार झाले असून त्याबाबत मोताळा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी यांचे पोस्टमार्टम केले असून त्यामध्ये ह्या मेंढरं हे इलेक्ट्रिक शॉक लागून ठार झाले असल्याचे निष्पन्न झाले असून, गणेश लवंगे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून एम एस सी बी ने त्यांना या झालेल्या नुकसानाची भरपाई करून द्यावी अशी मागणी मालक गणेश लवंगे यांची मागणी आहे तर लवकरात लवकर एम एस सी बी ने त्यांची मागणी पूर्ण करावी अन्यथा लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे गणेश लवंगे त्यांनी मोताळा लाईव्ह बोलताना सांगितले आहे