मोताळा लाईव्ह) मोताळा तालुक्यातील झालेल्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये तालखेड ग्रामपंचायत असून या गावचे लोक नियुक्त सरपंच मारुती कोल्हे यांच्यावरती दिनांक 26 मे 2025 रोजी 8 सदस्यांनी अविश्वास ठराव मोताळा तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता याच याच अविश्वास ठरावा वरती मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांनी 30 मे रोजी मतदान घेण्यासाठी तालखेड येथे गेले असता .. त्या ठिकाणी ठराव पारित होण्यासाठी नऊ सदस्यांची आवश्यकता असते मात्र त्या ठिकाणी फक्त सहा सदस्य हजर राहिल्या व सहा सदस्यांनी मतदान केले त्यामुळे तालखेड गावचे सरपंच असले मारुती कोल्हे यांच्यावर असलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला असून पुन्हा तालखेड गावच्या सरपंच पदी मारुती कोल्हे हेच विराजमान झाले असून गेल्या अनेक दिवसापासून विरोधक या संधीची वाट पाहत होते मात्र ही संधी यावेळेस विरोधकांची फसली असून गेल्या काही वर्षापासून मारुती कोल्हे यांनी गावाचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून गावात अनेक योजना सुद्धा या ठिकाणी राबवलेल्या आहे त्यामुळेच का पुन्हा मारुती कोल्हे यांना पुन्हा संधी मिळाली आहे का अशी चर्चा आता सध्या ऐकायला मिळत आहे….