[मोताळा लाईव्ह ] जि.प.म.प्रा.शाळा डिडाका बू येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात या निमीत्ताने नानावीद्य,आनंददायी शैक्षणिक उपक्रम आयोजीत करण्यात आले होत शाळेचा पहिला दिवस असल्याने नवोदित विदयार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्याथी यांच्या स्वागतासाठी रांगोळी व फुले व रंगीबेरंगी फुगे यांच्या सहाय्याने परिसर सुशोभित करण्यात आला होता. नवीन विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच नवीन व त्याचबरोबर नियमित विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, नवीन पुस्तकें व बूट सॉक्स वाटप करण्यात आले.पहिल्या दिवसाची सुरुवात आनंदाने व्हावी त्यासाठी आज मध्यान्ह भोजनासोबतच मिठाईचा बेतही ठरविण्यात आला होता. सर्व विद्यार्थी मित्रांनी त्याचा आनंद घेतला.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई निलेश समनेरे उपाध्यक्ष श्री अनिलभाऊ किरोचे, पालक सदस्य मा श्री शिवाजीभाऊ मिरगे, तसेच इतर पालक को, गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका व शाळेच्या मुख्याध्यापिका या सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविली.