मोताळा नगरपंचायत बनावट NOC प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल गुन्ह्यांमध्ये पाच जणांचा समावेश…..मोताळा नगर पंचायत हद्दीत असलेल्या सोलर प्लांट साठी बनावट NOC वापरून नगरपंचायत चा विकास शुल्क बुडावला.

36

[मोताळा लाईव्ह] मोताळा शहरापासूनच काही अंतरावरती 100 मेगावॅटचा सोलर प्लांटची उभारणी गेल्या काही दिवसापासून सुरू असून या सोलर प्लांटच्या उभारणीसाठी मोताळा नगरपंचायत हद्दीमध्ये सुरू आहे या प्लांटची उभारती करत असताना मोताळा नगरपंचायत ची परवानगी घेणे गरजेचे होते मात्र या ठिकाणी संबंधित कंपनीने मोताळा नगरपंचायत ची मुख्य अधिकारी यांची बनावट ना हरकत बनवून या ठिकाणी मोतळा नगरपंचायत चा लाखो रुपयांचा विकास शुल्क बुडवला याबाबत मोताळा नगरपंचायत चे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांनी याबाबत बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की माझ्या बनावट सईची एनओसी या कंपनीने विविध ठिकाणी उपयोग आणली असून व मोताळा नगरपंचायत चा विकास शुल्क या ठिकाणी बुडवला आहे यावरून बोराखेळी पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये मोताळा नगरपंचायत च्या नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख तसेच आवक-जावक लिपीक सुनिल मिरकुटे व सन पॉवर इंडीया VENTURES PRIVATE LTD लिमिटेड चे डेव्हलपमेंट मॅनेजर महेश शहाणे व शांताराम लोखंडे यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहे यामध्ये अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आणखी यामध्ये मोठा काही घोड आहे का ? अशी चर्चा सध्या मोताळा शहरामध्ये ऐकायला मिळत आहे