मोताळा तहसील कार्यालयाचा सर्व भार तहसील यांच्यावर जनतेचे कामे कसे होणार ? …. कार्यालयात नायब तहसीलदारच नाही

94

[ मोताळा लाईव्ह ] मोताळा तहसील कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नायब तहसीलदार दिसून येत नाही तर त्यांच्या असलेल्या कॅबिन सुद्धा सध्या भंगार अवस्थेत पडलेला पाहायला मिळत नाही .. मोताळा तहसील कार्यालयामध्ये एकूण ४ नायब तहसीलदार पदे मंजूर आहेत मात्र या ठिकाणी सध्या एकही नाही नायब तहसीलदार पाहायला मिळत नाही तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणचे नायब तहसीलदार पद आहे रिक्त आहे त्यामुळे संपूर्ण कामाचा ताण हा सध्याचे असलेले तहसीलदार हेमंत पाटील यांच्यावर पडत असून अनेक नागरिकांच्या रोशाला त्यांना सामना करावा लागत आहे तर सध्या शैक्षणिक कामासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना दाखल्यांची आवश्यकता असते तसेच शेतीच्या कामासाठी सुद्धा अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी सातबारा, फेरफार ,अशा कागदपत्रांची आवश्यकता असते मात्र या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून तहसीलदार हेमंत पाटील हे सर्व काम पाहत असून नायब तहसीलदार नसल्यामुळे अनेकांशी या ठिकाणी तहसीलदारांचे वाद विवाद सुद्धा पाहायला मिळाले आहे त्यामुळे मोताळा तहसील कार्यालयामध्ये लवकरात लवकर नायब तहसीलदार अशी मागणी आता जनतेकडून होत आहे