Motala live : ३ सप्टेंबर रोजी ग्राम पान्हेरा खेडी येथे नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने व शासकिय रक्तपेढी बुलडाणा यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले, सदर रक्तदान शिबिरामध्ये ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले, नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गेल्या १९ वर्षापासून सातत्याने समाजोपयोगी उपक्रमातून गणेश उत्सव साजरा करत आहे, यावर्षी सुद्धा श्री डी एस वले सर यांचा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, गोदावरी फाउंडेशन मार्फत आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांचा पारंपारिक वेशभूषा कार्यक्रम, संगीत विशारद श्री प्रमोद पाटील यांचा संगीत संध्या अशा वेगवेगळ्या समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले होते, तहसीलदार श्री हेमंत पाटील साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळाला भेटी दिल्या आहे. तसेच दिनांक ०३ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री नागेश जायले साहेब यांचा स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, ०४ सप्टेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमित बामरटकर यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामध्ये २५० रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले . नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने लोककला संवर्धन, वृक्ष लागवड व संवर्धन, व्यसनमुक्ती, प्लास्टिक बंदी जागरूकता, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धा, परिसरातील पक्षांना पाणवठे बसविणे, ग्रामस्वच्छता, बालविवाह जागरूकता, विविध शासकीय योजनांची माहिती देणे अशा स्वरूपाचे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. मंडळाला २०१६ मध्ये शासनाचा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ मध्ये सहभाग घेतला आहे त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय समितीने मंडळाला ४ सप्टेंबर रोजी भेट देऊन परीक्षण केले