बंजारा समाजाला ST प्रवगातून आरक्षण द्यावे उद्या बंजारा समाजाचा मोताळा तहसील कार्यलयावर मोर्चा ..

203

[मोताळा लाईव्ह ] सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच गाजत असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई येथे आंदोलन केले तर यालाच विरोध करत ओबीसी सुद्धा आता रस्त्यावर उतरली आहे बंजारा समाज सुद्धा रस्त्यावर उतरला असून बंजारा समाजाला आता एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली असून यासाठीच बंजारा समाज हा आक्रमक झाला आहे
मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज असून उद्या दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ११ वाजता मोताळा तालुक्यातील समस्त बंजारा समाजा तहसील कार्यालयातील मोर्चा काढून बंजारा समाजाला ST प्रभागातून आरक्षण द्यावे ही मागणी साठी तहसीलदार यांना निवेदन सादर करणार आहे त्यासाठी मोताळा तालुक्यातील सर्व बंजारा समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा समाजाचे नेते यशवंतराव धाबे माजी सभापती पंचायत समिती मोताळा यांनी आवाहन केले आहे