अल्पसंख्यांक समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याची मागणी

43

[मोताळा लाईव्ह] अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ठोस धोरणे आखण्यासाठी आणि योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याची मागणी मार्टि कृती समिती महाराष्ट्र तर्फे करण्यात आली.यासंदर्भात मंत्रालयात मा. सचिव रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन सरचिटणीस अँड . शेख वासिम,रियाज सौदागर अल्पसंख्यांक सोसायटी असोसिएशन सदस्य चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. अध्यक्ष अँड . अझर पठाण, सचिव अँडशबाझ पठाण, सहसचिव नबील उल जमा, उपाध्यक्ष सईद असिफ यांची सही असलेल्या या निवेदनात समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.

प्रमुख मागण्या:

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणे.७ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिलेल्या अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि) तातडीने सुरु करणे.मुस्लिम विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षणसुविधा देणे.युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना राबविणे.शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी सेवांमध्ये किमान ८% आरक्षणाची अंमलबजावणी.सर्व योजनांची एकसमान व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ठोस यंत्रणा उभारणे.