मोताळा तहसीलदार हेमंत पाटील हे अँटीकरप्शन अकोला ( ACB ) च्या जाळ्यात.. शेतकऱ्यांकडुन बुलडाणा येथील राहत्या घरी स्वीकारली 2 लाखाची लाच……

67

(मोताळा लाईव्ह )..मोताळा तालुक्यातील तहसीलदार हेमंत पाटील यांना अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या वर्ग २ जमिनीचा वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र संबंधित काम करून देण्यासाठी तहसीलदार हेमंत पाटील यांनी २ लाख रुपयांची लाच मागितली होती.

शेतकरी अडचणीत असल्याने त्याने थेट अकोला अँटी करप्शन विभाग अकोला यांच्या धाव घेतली. अँटी करप्शन विभागाने तक्रारीची शहानिशा करून जाळे आखले. दिनांक 14 सप्टेंबर 2025 रविवारी रोजी बुलढाणा येथे तहसीलदार हेमंत पाटील यांच्या राहत्या घरी पथकाने सापळा रचून शेतकऱ्याकडून मागितलेली २ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना तहसीलदारांना रंगेहात पकडले.

या धाडसी कारवाईमुळे मोताळा तालुक्यात तसेच जिल्ह्यात प्रशासनात खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत आणखी एका अधिकाऱ्याचा समावेश झाल्याने जनतेत अँटी करप्शन विभागाच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे. लाचेची मागणी: वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी…लाचेची रक्कम: २ लाख रुपये कारवाई बुलढाणा येथील तहसीलदारांचे राहत्या घरी कारण्यात आली सादर हे कारवाई अकोला अँटी करप्शन यांनी केली आहे