मोताळा तहसील येथे कायमस्वरूपी तहसीलदार द्या …भाजपा तालुकाध्यक्ष सचिन शेळके

37

Motala live : मोताळा भाजपा तालुकाध्यक्ष सचिन शेळके पाटील यांनी अमरावती येथे झालेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पदाधिकारी मेळाव्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना निवेदन देऊन.मोताळा येथील कार्यालयात तहसीलदार श्री हेमंत पाटील हे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अडकल्याने मागील दहा ,बारा दिवसापासून तहसील कार्यालयातील नागरिकांची कामे खोळंबली आहे ,मोताळा तहसीलचा प्रभार सध्यस्थितीत नांदुरा तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेला आहे, मात्र ते मोताळा तहसील ला वेळ देऊ शकत नाही. तसेच या सर्व गोंधळात मोताळा तालुक्यातील विद्यार्थ्यांची कामे, उत्पन्नाचे दाखले, शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे कामे व इतर तहसील संबंधित कागदपत्रे यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधव व विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील खामखेड, गुळभेली, उबाडखेड, सोनबरड, नाईकनगर नळकुंड, व तालुक्यातील इतरही गावात ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. मका, कपाशी, सोयाबीन, तूर, भाजीपाला इ पिके उध्वस्त झाली आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु आहेत.

तरी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच मोताळा तहसील येथे लवकरात लवकर कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावा,असे निवेदन मोताळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले त्यावेळी तालुकाध्यक्ष सचिन शेळके पाटील,उपतालुका अध्यक्ष श्रीकांत घाटे, बुलढाणा ग्रामीण मंडळ अध्यक्ष सतिश भाकरे पाटील उपस्थित होते.