मोताळा येथे मोफत नमो नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीराचे आयोजन

201

[मोताळा लाईव्ह] देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवाडा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.मोताळा येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्ष मोताळा तालुका व मुख्यमंत्री सहायता निधी, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून “नमो नेत्र तपासणी” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नमो नेत्र तपासणी शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, तसेच मोतिबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात नेत्र तपासणी साठी जिल्हातील सुप्रसिद्ध खासगी व सरकारी नेत्ररोग तज्ञ उपलब्ध असणार आहे. हे शिबीर दिनांक- सोमवार, 29 सप्टेंबर 2025 सकाळी 9 ते दुपारी 3 वाजे पर्यंत स्थळ- ग्रामीण रुग्णालय, मोताळा येथे असून या मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व नेत्र रुग्णांनी तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा व इतरांनाही कळवावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे मोताळा मंडळ अध्यक्ष सचिन शेळके यांनी केले आहे. तसेच तपासणी साठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाने सोबत आधार कार्ड व मोबाईल आणणे अनिवार्य आहे अशी सूचनाही त्यांनी केली आहे.