माँ वैष्णवी रुद्र मंडळातर्फे नवरात्री उत्सवाचे आयोजन
खामगाव- येथील माँ वैष्णवी रुद्र नवरात्री उत्सव मंडळ( वर्ष 7 वे) सिव्हील लाईन, भिसे प्लॉट येथे नवरात्री उत्सव मोठया उत्साहात संपन्न होत आहे..मंडळाचे हे सातवे वर्ष असून याअगोदर मंडळाने बाल अत्याचार रोखण्यासाठी’ हमने ठाना है’चे बॅनर लावून जनजागृती केली तर त्यानंतर कोरोना महामारीच्या काळात कोरोना नियमांचे पालन करून मंडळाने महाराष्ट्र राज्याच्या ‘मिशन कवच कुंडल’ चे सफल आयोजन केले होते.यामध्ये शेकडो लोकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घेतला होता.यासह आझादी का अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीपर गीत,प्रबोधनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता.तर याशिवाय उन्हाळ्यात पाणपोई लावण्यात आली आहे यासह विविध समोजपयोगी उपक्रम श्री महारुद्र सेवाभावी संस्था रजि नं F- 0018031(बुल) अंतर्गत माँ वैष्णवी रुद्र नवरात्री उत्सव मंडळ राबवित असते.अशी माहिती श्रीकांत भुसारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
* छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाचे बॅनर ठरत आहे आकर्षण
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एक सामान्य पुरुष नसून एक दैवी अंश होते, की ज्यांच्यावर देव सुद्धा प्रसन्न होते .त्यांना तुकाराम महाराज, रामदास स्वामी आणि तुळजाभवानी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळाला आणि तुळजाभवानी मातेने तर त्यांना हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी तलवार दिली. शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या पिढीच्या स्मरणात राहण्यासाठी आणि आजच्या लहान पिढीतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची महती तसेच आदर्श घ्यावा तसेच याच माध्यमातून आजच्या पिढीला आपल्या हिंदू धर्माचे कार्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी माँ वैष्णवी रुद्र नवरात्री उत्सव मंडळातर्फे ( वर्ष 7 वे) सिव्हिल लाईन भिसे प्लॉट,खामगाव तर्फे शिवराज्याभिषेकास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत.त्या निमित्त शिवराज्याभिषेक तसेच हिंदवी स्वराज्याची शपथ घेतानाचे बॅनर लावून जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.