राज्य व केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा……सौ. राजकुमारी तेजेंद्रसिंह चौहान यांचे प्रतिपादन सकल मराठा समाज आंदोलनास साखळी उपोषण करून दिला पाठींबा

284

दि.2 नोव्हेंबर खामगाव-. मा. त्यागमूर्ती मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाज बांधवाना आरक्षण मिळण्याकरिता गेल्या सात दिवसापासून उपोषण सुरु केले आहे. त्यास हिंगणा कारेगावचे सरपंच सौ राजकुमारी तेजेन्द्र्सिंह चौहान यांनी पाठींबा देऊन साखळी उपोषण केले.

मराठा समाजाची मागणी रास्त व कायद्याला धरून आहे. मा. मनोज जरांगे पाटील यांनी आपला जीव धोक्यात घालून व वयोवृद्ध आई, पत्नी, व लहान दोन मुली यांच्या जीवनाची पर्वा न करता समाजासाठी जीवन समर्पण करीत आहेत. म्हणून आपले एक कर्तव्य म्हणून या आंदोलनास पाठींबा देऊन खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

या आंदोलनास आमचा जाहीर पाठींबा असून शासनास या माध्यमातून इशारा आहे कि, महाराष्ट्र शासनाने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण संबधित ठराव पारित करावा व केंद्राकडून संसदेत संमत करून घ्यावे. मराठा आरक्षणास कायद्याचे स्वरूप द्यावे असे मत सौ. राजकुमारी तेजेन्द्र्सिंह चौहान यांनी मांडले.

या आंदोलनास प्रवीण कदम, संतोष येवले, शिवा जाधव, शंकर खराडे, कडूचंद घाडगे, यांनी सुद्धा सहभाग दिला.