घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाची चौकशी न केल्यास करण्यात येणार उपोषण

133

[ मोताळा लाईव्ह ] मोताळा तालुक्यातील ग्रामपंचायत ब्राम्हदा-खांडवा येथे करण्यात आलेल्या सन 2023 – 24 च्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाबाबत तक्रार ब्राम्हदा येथील अन्सार शा शब्बीर शा यांनी दिनांक 27/12/2023 रोजी गटविकास अधिकारी मोताळा यांच्याकडे दाखल केली होती सदर तक्रारीची दखल न घेतल्या कारणाने दिनांक 19/09/2025 रोजी सदर घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाची चौकशी करावी तसेच निकृष्ट असलेल्या कामाबाबत संबंधित ठेकेदारावरती कठोरात कठोर कारवाई करावी व शासनाच्या पैशाचा होणारा अपव्य टाळावा यारीता दिनांक 19/09/2025 रोजी गटविकास अधिकारी मोताळा यांना निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की सदर कामाची चौकशी करून दोशींवरती कठोर कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबल्या जाणार असल्याबाबत गटविकास अधिकारी मोताळा यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर निवेदनाची प्रत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आली आहे.